मनु भाकर ही भारतातील एक प्रतिभावान नेमबाज आहे. तिने आपल्या कमी वयातच नेमबाजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात जन्मलेल्या मनुने लहानपणापासूनच खेळांमध्ये रस दाखवला.
तिने ह्येन लँगलॉन, मणिपुरी मार्शल आर्ट, बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंग यासारख्या विविध खेळांमध्ये आपली हातखंडी आजमावली. त्यापैकीही तिने मार्शल आर्टमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली.
यानंतर मनुने आपले लक्ष्य नेमबाजीकडे वळवले.
अवघ्या काही वर्षांतच तिने नेमबाजीच्या क्षेत्रात धुमाकळ उठवली.
खाशाबा दादासाहेब जाधव: भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेता
निळा देवमासा (blue whale) माहिती
आदित्य l1 माहिती मराठी
तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून भारताचे नाव उंचावले.
2018 मध्ये आयोजित झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात मनुने दोन सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला. ती या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय ठरली. यानंतर तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला.
2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनुने इतिहास रचला.
तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक(Bronze medal) जिंकून भारताला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिले.
हे यश आणखी खास आहे कारण ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे
या विजयाने संपूर्ण देशात उत्साह निर्माण झाला आणि मनु ही भारतातील नव्या पिढीची क्रीडा आयकॉन बनली.
मनु भाकरची ही सुरुवात आहे. तिच्याकडून भविष्यात अजूनही अनेक अपेक्षा आहेत. तिची कठोर मेहनत, ध्येयनिष्ठा आणि प्रतिभा यामुळे ती नक्कीच भारताला आणखी गौरव मिळवून देईल यात शंका नाही .
मनु भाकर ही भारतातील नेमबाजी विश्वातील एक उज्वल नक्षत्र आहे आणि तिच्या भविष्यातील कामगिरीची देशाला उत्सुकता आहे.