26 जानेवारी भाषण मराठी
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष , सन्माननिय व्यासपीठ व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ,आजचा दिवस खुपच विशेष आहे कारण आज आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतआहोत.
आजचा हा दिवस भारताच्या इतिहासातला एक अविस्मरणीय दिवस आहे.
26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले, आणि त्याचबरोबर आपण स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक झालो.
हा दिवस फक्त सुट्टी साजरा करण्याचा नाही, तर देशाला घडवणारे वीर, संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले.
महात्मा गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाने ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले, तर भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु यांसारख्या तरुणांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्याची किरण दाखवली.
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि अनेक समाजसुधारकांनी समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला आणि समानतेचा पाया रचला.
या सर्व महापुरुषांच्या योगदानाने आज आपण स्वतंत्र आणि समतावादी राष्ट्र म्हणून ओळखले जातो.
संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे.
आपले संविधान हे आपल्याला आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते .
ते धर्माच्या, जातीच्या आणि आर्थिक पातळीवरून भेदभाव करत नाही, आणि प्रत्येकाच्या विकासाची हमी देते.
आपल्या संविधानाचा आदर करणे आणि त्या तत्वांचे पालन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
संविधानाने आपल्याला काय अधिकार दिले आहेत किंवा आपले काय हक्क आहेत केवळ हेच जाणून न घेता त्याबरोबर आपले आपल्या देशाप्रती काय कर्तव्य आहे हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
आपल्याला देशाच्या विकासात सहभागी व्हायचे आहे.
आपल्या शाळेत, आपल्या महाविद्यालयात, आपल्या कार्यालयात, आपल्या गावात आणि आपल्या शहरात आपल्या कामातून देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे.
शिक्षण, आरोग्य , रोजगार आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रगती करण्याची गरज आहे.
आपल्याला शिस्तबद्ध राहून, प्रामाणिकपणे काम करून, आणि एकमेकांचे सहकार्य करून भारताला जगात आदर्श देश बनवायचा आहे.
आपल्याला आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करायचे आहे. आपल्या नदी, डोंगर आणि जंगले यांचे जतन करायचे आहे.
आपल्या येणार्या पिढींसाठी , सुंदर आणि निरोगी पृथ्वी देण्याची जबाबदारी आपली आहे ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहायचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत राहायचे आहे .
आपल्या देशाला आणखी मजबूत आणि विकसित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे.
आपण स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्यासाठी, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे .
मित्रहो, प्रजासत्ताक दिन हा केवळ एकच दिवस साजरा करण्याचा नाही तर हा दिवस म्हणजे आपल्या जीवनाचे एक मार्गदर्शक तत्त्व आहे.
हा दिवस आपल्यामध्ये जागृती निर्माण करतो, आपल्याला देशभक्तीचा संदेश देतो आणि आपल्याला त्याप्रमाणे कृती करण्याची प्रेरणा देतो.
तर मित्रमहोदयांनो, हा स्वातंत्र्याचा सुगंध घेऊन आपण भविष्याकडे पाहूया.
आपल्या पूर्वजांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी आपण एकजुटीने आणि कर्तव्यनिष्ठेने काम करूया.
आजच्या दिवशी आपण सर्वानी एकत्र येऊन भारताला अधिक चांगला देश बनवण्याचा संकल्प करूया.
आपण आपल्या कर्तव्य़ांची जाणीव ठेवूया आणि आपल्या देशासाठी प्रामाणिकपणे काम करूया.
आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांना सार्थ ठरवूया आणि आपल्या देशाला जगात आदर्श देश बनवूया.
येणाऱ्या पिढ्यांना स्वतंत्र, समतावादी आणि विकसित भारत देऊन आपण आपले कर्तव्य पार पाडूया.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
26 जानेवारी 2024 रोजी आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत ?
26 जानेवारी 2024 रोजी आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.
भारत प्रजासत्ताक केव्हा झाला ?
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती देशात अंमलात आणली गेली. त्या दिवसापासून भारताला प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाते.
प्रजासत्ताक दिनाचे भाषण कोण देते ?
प्रजासत्ताक दिनाचे भाषण भारताचे राष्ट्रपती देतात. हे भाषण दरवर्षी 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावर आयोजित होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान दिले जाते.
हे भाषण भारताच्या इतिहास, संस्कृती आणि भविष्यातील आव्हानांवर आधारित असते.
भारताला प्रजासत्ताक का म्हणतात ?
भारताची राज्यघटना, जी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे.
प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्रप्रमुख हे वारसाहक्काने निवडले न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून होते .
प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजे सर्व नागरिकांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे.
ते निवडणुकांमध्ये मतदान करू शकतात, सरकारला प्रश्न विचारू शकतात.
भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य .
भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. याचा अर्थ असा की भारतावर कोणत्याही परदेशी राष्ट्राचा ताबा नाही.
भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण आणि न्याय्य धोरण आणि इतर सर्व धोरणे ठरवते.
म्हणूनच, भारताला प्रजासत्ताक असे म्हणतात.
26 January speech Marathi for Small children /26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी 10 ओळी
नमस्कार , माझे नाव वेदांत आहे .
आज आपण 26 जानेवारी 2024 ला आपल्या देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा.
26 जानेवारी 1950 ला आपल्या देशाला संविधान मिळाले .
आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता आहे आणि हेच आपल्या वैशिष्ट्ये आहे .
आपल्या संविधानाचा आदर करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.
आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे आपली जबाबदारी आहे .
आपण सर्वांनी एकमेकांशी आदराने आणि प्रेमाने वागणे आपले कर्तव्य आहे .
मी भारतीय असण्याचा मला खूप अभिमान आहे.
माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे .
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो !
जय हिंद जय महाराष्ट्र !
Also Read –Shree Ram Mandir Ayodhya Information in Marathi / श्रीराम मंदिर माहिती मराठी
तुम्हाला माहित आहे अंतराळ स्थानकावर अंतराळवीर काय करतात? स्पेस स्टेशन कसे दिसते?
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाबाहेर किती थंडी आहे? चंद्रावर जाणारा पहिला भारतीय कोण?
या बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे ?
तर मग इथे वाचा – Astronaut information in marathi /अंतराळवीर माहिती मराठी