छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझे वंदन .
आदरणीय उपस्थित मान्यवरांनो,
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ,सन्माननीय व्यासपीठ व माझ्या येथे जमलेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
आज आपण सर्वजण शिवजयंती साजरी करत आहोत.
ही केवळ एक जयंती नसून, स्वराज्याचा ध्वज उंचवणाऱ्या , छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर कार्याची स्मृती आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराजां विषयी मला बोलण्याची संधी मिळणे हे माझे मी एक मोठे परमभाग्य समजतो .
त्यांच्या पराक्रमाची आणि न्याय्य राज्यकारभाराची गाथा आजही आपल्या मनांचा रोमांच उठवते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले.
त्यांनी कठीण परिस्थितीशी झगडत जिजामाता आणि गुरू रामदासांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
अल्प वयातच त्यांनी गनिमी काव्यांचा अभ्यास केला,
किल्ले जिंकणे, नौदल उभारणे, स्वराज्यासाठी रणनीती आखणे, अशा अनेक बाबतींत त्यांनी अद्भुत कौशल्य दाखवले ,
आणि मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचा पाया घातला.
सिंहगड, रायगड, प्रतापगड असे किल्ले एकापाठोपाठ एक जिंकून त्यांनी स्वराज्याची सीमा वाढवली.
त्यांची रणनीती, धर्मनिष्ठा आणि मावळ्यांवरील प्रेम यामुळेच ते अजेय ठरले.
त्यांच्या धर्मवीरत्वाची ख्याती दूरवर पसरली.
ते धर्म आणि न्यायनिष्ठ राजा होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त केवळ एक राजाच नव्हते, तर ते स्वराज्याचे स्वप्न पाहणारे, कष्ट करून ते पूर्ण करणारे आणि त्या स्वराज्याचे रक्षण करणारे एक खरा योद्धा होते.
त्यांच्या राजवटीत सर्वधर्म समभाव होता.
त्यांनी सगळ्यांना समान अधिकार दिले.
शेतकरी आणि सामान्य लोकांचे कल्याण हे त्यांच्या राज्यकारभाराचा कळीचा मुद्दा होता.
आज आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि न्यायनिष्ठेची प्रेरणा घेऊन आपण त्यावर मात करू शकतो.
स्वच्छ समाज, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, शेतकऱ्यांचे कल्याण, महिलांचा सन्मान, अशा अनेक बाबतींत त्यांचे आदर्श आपल्या मार्गदर्शक ठरू शकतात.
शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे म्हणजे केवळ त्यांची स्तुती करणे नाही, तर त्यांच्या आदर्शांचे स्मरण ठेवून आपले जीवन अधिक सार्थक करणे आहे.
चला तर मग आजच्या या पवित्र दिवसाला साक्षी ठेवून आपण सगळे धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालत स्वराज्याचा खरा अर्थ जपूया !
पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी नमन करतो व माझे भाषण संपवतो.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
जय शिवराय !
छत्रपती शिवाजी महाराज जयंती छोटे भाषण लहान मुलांसाठी मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti short speech for kids in Marathi)
नमस्कार माझे नाव आर्यन आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांना माझे वंदन .
आज 19 फेब्रुवारी 2025 हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे.
कारण आज आपण शिवजयंती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीत सरदार होते आणि आई जिजाबाई या थोर समाजसुधारक होत्या.
लहानपणापासूनच शिवाजी महाराज अतिशय बुद्धिमान आणि पराक्रमी होते.
त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी, आणि युद्धकला यांमध्ये विशेष रुची होती.
जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथांचे शिक्षण दिले.
त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात शौर्य, धर्मपरायणता आणि नीतिमत्तेचे संस्कार रुजवले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे थोर राजे होते.
त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि धाडसाने मराठा साम्राज्याची स्थापना केली.
शिवाजी महाराज हे आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत.
त्यांच्या पराक्रमाची, धैर्याची आणि नीतिमत्तेची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते.
आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालून आपले जीवन घडवावे आणि देशासाठी योगदान द्यावे.
छत्रपती शिवाजी महाराजांना माझे वंदन करतो आणि माझे भाषण संपवतो .
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
जय शिवराय !
शिवाजी महाराजांचा जन्म कुठे आणि कधी झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना काय शिकवले?
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते .
त्यांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथांचे शिक्षण दिले.
जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवले की –
- सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालणे.
- धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणे.
- गरीब आणि गरजू लोकांची मदत करणे.
- देशभक्ती आणि पराक्रम दाखवणे.
- शत्रूशी लढा देणे आणि त्यांचा पराभव करणे.
शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला जिंकून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली?
तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली .
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या?
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या –
- राजकीय सुधारणा – त्यांनी अष्टप्रधान मंडळ नावाची एक व्यवस्था स्थापन केली ज्याद्वारे राज्याचा कारभार सुव्यवस्थितपणे चालवला जात होता.
- सामाजिक सुधारणा – त्यांनी स्त्रियांसाठी आणि गरीब लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.
- आर्थिक सुधारणा – त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या ज्यामुळे स्वराज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली.
- लष्करी सुधारणा – त्यांनी मराठा सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण दिले ज्यामुळे ते एक शक्तिशाली लष्कर बनले.
शिवाजी महाराज आपल्यासाठी का प्रेरणास्थान आहेत?
शिवाजी महाराज अनेक कारणांमुळे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत –
- त्यांचे पराक्रम आणि धैर्य – त्यांनी अल्पावधीतच शक्तिशाली स्वराज्य स्थापन केले आणि अनेक पराक्रमी लढाया लढून मुघलांना परास्त केले.
- त्यांची नीतिमत्ता आणि न्यायप्रियता – ते एक न्यायप्रिय राजा होते आणि त्यांनी नेहमी सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यास प्राधान्य दिले.
- त्यांचे देशभक्ती आणि समाजसेवा – त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी समर्पित केले.
- त्यांचे कुशल प्रशासन आणि दूरदृष्टी – ते एक कुशल प्रशासक होते आणि त्यांनी स्वराज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या.