सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी /Savitribai Phule Jayanti speech in marathi (2025)

1. सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी (Savitribai Phule Jayanti speech in marathi)

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष /आयोजक,सन्माननीय व्यासपीठ व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो !

आज 3 जानेवारी ,आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत .

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला .

सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान स्त्री ची गाथा सांगताना एक वेगळीच ऊर्जा संचारते.

बालपणापासूनच त्यांना जाती-जमातीचे भेदभाव, स्त्रियांवरील अत्याचार, शिक्षणाचा अभाव याचे ज्वलंत चित्र दिसत होते, त्यांच्या जिज्ञासू मनाला विद्या प्राप्त करण्याची इच्छा होती.

त्यांचं लग्न वयाच्या नऊव्या वर्षी झालं, तेव्हा त्यांचे पती जोतिराव फुले फक्त 13 वर्षांचे होते. या वयातच त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं आणि जोतिरावांच्या पाठिंब्याने स्वतः शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

त्यांचा हा धाडसी निर्णय त्या काळात खूप मोठा होता.

त्यांनी स्वतःच्या जिद्दीने आणि पती ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्याने शिक्षण पूर्ण केले. ही गोष्ट त्या काळात क्रांतिकारी होती, कारण स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी होती.

सावित्रीबाईंच्या मते, शिक्षण हे महिलांना सक्षम करण्याचे आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन होते.

शिक्षण हेच समाजातील बदलाचे हत्यार आहे, हे सावित्रीबाईंनी जाणले. ज्योतीराव सुशिक्षित आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणारे कट्टर समाजसुधारक होते.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा काढली.

त्यांची हि बहुमूल्य कामगिरी म्हणजे संपूर्ण स्त्री जाती साठी एक क्रांतीची ज्योती च लावणे, नाही का ?

त्या काळात मुलींना शिक्षण देणे हा गुन्हा होता, पण सावित्रीबाईंनी धाडस करून मुलींना वाचणे, लिहिणे,धर्मग्रंथ आणि गणित शिकवले.

यासोबतच शेती, आरोग्य , स्वयंपाक या कौशल्यांचेही शिक्षण दिले जात होते. यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होत होता, त्यांचे जीवन उज्ज्वल होत होते.

पण, त्यांच्या या कार्याला तीव्र विरोध झाला. उच्च जातीच्या लोकांनी त्यांच्यावर दगड ,चिखल फेकले , शिवीगाळ केली, पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही. त्यांनी धीर धरला आणि अविरतपणे काम चालू ठेवले .

त्यांनी उच्च जातीच्या मुलींबरोबरच अस्पृश्यांनाही शिक्षण दिले. हे त्यांच्या धाडस आणि सामाजिक समतावरील दृढ विश्वासाचे प्रतीक होते.

त्यांनी विधवांना, बालविधवांना आधार दिला. त्यांच्यासाठी आश्रम स्थापन केले आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली.

सावित्रीबाई या स्त्रियांचे आयुष्य अंधारातून उजेडाकडे नेणारी एक ज्योतच होत्या .

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रभाव फक्त पुण्यापुरताच किंवा केवळ महाराष्ट्रा पुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण भारतात होता.

त्यांच्या प्रेरणेने अनेक शिक्षण संस्था सुरू झाल्या आणि मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले.

त्यांच्या सामाजिक कार्यामुळे अन्याय आणि भेदभाव विरोधात आवाज उठवण्याची चळवळ बळकट झाली.

सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन आपण नेहमी धैर्याने आणि दृढनिश्चयाने आपल्या ध्येयासाठी झटले पाहिजे आणि ज्याप्रमाणे सावित्रीबाईंनी अनेक अडचणींवर मात करून आपल्या कार्यात यश संपादन केले त्याचप्रमाणे आपणही अडचणींतून मार्ग काढून सदैव आपले ध्येय गाठण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे .

आज आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करतो, पण आपण केवळ जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवू नये तर आपल्या जीवनातील त्याचे महत्त्वही जाणून घेतले पाहिजे.

त्यांनी आपल्या जिद्दीने आणि धाडसाने समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्यांचं जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सावित्रीबाई या फक्त स्रीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठीच अंधारातून उजेडाकडे नेणारी एक ज्योतच ठरल्या, आणि म्हणूनच आपण म्हणतो ,

“मुलगी शिकली , प्रगती झाली !” ,

“साक्षर स्त्री घरादाराला पुढे नेई !”

हे भारतवर्ष कायम या महान गौरवशाली मातेचे ..क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सदैव ऋणी राहील !

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!


2. सावित्रीबाई फुले भाषण मराठीत मुलांसाठी (2025)/ Savitribai Phule speech in Marathi for kids (2025)

आजच्या कार्यक्रमाच्या सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार .

आज मी तुम्हाला एका महान क्रांतिकारी महिलेबद्दल सांगणार आहे…त्यांचं नाव होतं सावित्रीबाई फुले.

त्या एक महान शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या वीर स्त्री होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला .

त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. परंतु सावित्रीबाईला वाटले की शिक्षण हे प्रत्येकाला, मुलींना आणि मुलांना समान महत्वाचे आहे.

त्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी भारतातील पहिली शाळा उघडली! आपण कल्पना करू शकता की ते किती धाडसी होते? लोक त्यांच्यावर हसले आणि दगडफेकही केली. पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही.

त्यांनी मुलींना लिहायला-वाचायला शिकवलं आणि आजारी आणि गरीब महिलांनाही मदत केली. ज्या महिलांना कुठेही जाण्याची सोय नव्हती त्यांच्यासाठी निवारा दिला.

सावित्रीबाई फुले अतिशय दयाळू आणि धैर्यवान महिला होत्या.

त्या महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी लढल्या आणि त्यांच्या जीवनात सावित्रीबाईंनी एक परिवर्तन घडवून आणले.

सावित्रीबाई फुले यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात बदल घडवून आणला. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणा स्त्रोत आहेत.

अशा या थोर क्रांतिकारी मातेला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे भाषण संपवितो .

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!


26 जानेवारी भाषण मराठी


Savitribai Phule Information in Marathi/ सावित्रीबाई फुले माहिती मराठी

स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ, अस्पृश्यांना ज्ञानाची वाट क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एक आदर्श शिक्षिका आणि समाजसुधारक ! Read more


Leave a Comment