लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण
आज आपण भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्य सेनानी आणि एक महान नेते, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करत आहोत.
“जय जवान, जय किसान” या नार्याने देशाला प्रेरणा देणारे महान नेते लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर, 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. त्यांचे बालपण खूपच साधे होते. त्यांनी आपले शिक्षण मुगलसराय आणि बनारस येथे घेतले.
त्यांचे वडिल शरद प्रसाद श्रीवास्तव आणि आई रामदुलारी देवी होत्या.
लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन हे साधेपणाचे प्रतीक होते. त्यांना देशप्रेम, अखंडता आणि एकता या मूल्यांवर खूप विश्वास होता.
त्यांच्या जीवनावर महात्मा गांधींच्या विचारांचा खूप प्रभाव होता. ते महात्मा गांधींचे अनुयायी होते.
शास्त्रीजींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक सत्याग्रह चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यांना त्यांच्या देशभक्ती आणि नेतृत्व क्षमतेसाठी ओळखले जात होते.
लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अतुलनीय योगदान दिले. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना ब्रिटीशांच्या तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला.
ते नेहमीच लोकांच्या हृदयात राहिले. त्यांचा साधेपणा आणि नि:स्वार्थ भाव सर्वत्र पाहायला मिळतो. त्यांनी कधीही पद आणि प्रतिष्ठेची आकांक्षा बाळगली नाही. त्यांच्यासाठी राष्ट्रहित सर्वोपरि होते.
लाल बहादूर शास्त्री यांनी भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक योजना राबवल्या.
त्यांच्या मते देशाची प्रगती सर्वसमावेशक असावी आणि कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष होता कामा नये.
मूर्ती लहान पण कीर्ती महान असेच काही शास्त्रीजींचे व्यक्तिमत्त्व होते.
शास्त्रीजींच्या काळातच श्वेत क्रांती आणि हरित क्रांती यांना चालना मिळाली. त्यांनी देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठीही प्रयत्न केले.
त्यांच्या काळात भारत-पाकिस्तान युद्ध झाले आणि शास्त्रीजींनी आपल्या नेतृत्वाखाली देशाला विजय मिळवून दिला. त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य “जय जवान जय किसान” आजही आपल्या कानावर कोरलेले आहे.
या घोषणेने देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशातील सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्त्व जाणून दिले.
शास्त्री हे नम्र, खंबीर, सहनशील आणि मोठ्या आंतरिक शक्तीने लोकांच्या भावना समजून घेणारे एक महान नेते होते.
देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारे ते एक दूरदृष्टी असलेले नेते होते.
शास्त्रीजींचा मृत्यू 11 जानेवारी, 1966 रोजी ताश्कंद येथे झाला. भारत-पाकिस्तान युद्धानंतर शांति करारावर स्वाक्षी करण्यासाठी शास्त्रीजी ताश्कंदला गेले होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
लाल बहादूर शास्त्री यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला होता.
अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन .
जय हिंद ! जय भारत !
मोर पक्षाची संपूर्ण माहिती मराठी
ऑलिम्पियाड परीक्षा संपूर्ण माहिती
हरितगृह वायू संपूर्ण माहिती मराठी