15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे भाषण मराठी 2024/ Independence Day Speech In Marathi 2024

1. स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण (Speech on Independence Day)

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय शिक्षक वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ,

आज आपण 15 ऑगस्ट ला देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत .

15 ऑगस्ट म्हटले कि आपल्या सगळ्यांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होते. या दिवसाचा महिमा आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण करून देतो.

150 वर्षे आपला देश इंग्रजांच्या गुलामीत होता, आपल्या देशाला गुलामीतून बाहेर आणण्यासाठी स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वीर पुरुषांनी आपले प्राण पणाला लावले.

महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या शस्त्राने, सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारक विचारांनी, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या शौर्याने ब्रिटिश साम्राज्य उद्ध्वस्त झाले. त्यांच्या बलिदानाचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही.

आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला विविध क्षेत्रात प्रगती करण्याची संधी देतो.

शास्त्र, तंत्रज्ञान, कला, साहित्य, खेळ या प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाने प्रगती केली आहे.

पण या प्रगतीच्या बरोबरच आपल्यासमोर अनेक आव्हाने देखील आहेत.

बेरोजगारी, दारिद्र्य, असमानता, भ्रष्टाचार या समस्यांवर आपण एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

शिक्षण, आरोग्य, कृषी या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करून आपण समृद्ध भारत निर्माण करू शकतो.

आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा आपल्याला एकसूत्री धाग्याने बांधून ठेवते.

विविध धर्म, भाषा, संस्कृती असलेला हा देश एकात्मतेचे प्रतीक आहे. आपण या विविधतेत एकता साधूनच प्रगती करू शकतो.

आजच्या तरुण पिढीने देशसेवेची प्रेरणा घ्यावी. आपल्या देशाच्या विकासात सहभागी व्हावे. तंत्रज्ञानचा वापर करून नवीन संधी निर्माण कराव्यात.

एक जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावत आपण देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावणे आवश्यक आहेच आणि ते आपले सामाजिक कर्तव्य देखील आहे.

आपल्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया.

आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय हिंद ! जय भारत !


2. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण (15 August Independence Day Speech)

माननीय मुख्याध्यापक महोदय/महोदया, आदरणीय शिक्षक, शिक्षिका आणि माझे प्रिय सहपाठी मित्रांनो,

आज आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

या पवित्र दिवशी, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीर सपूत आणि वीरांगनांच्या बलिदानाला नमन करूया.

15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत माता स्वतंत्र झाली.

15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन आपण प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा करतो.

पण हा उत्सव फक्त एक दिवसापुरता मर्यादित राहू नये. आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे, देशाच्या प्रगतीत योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे.

आजचे आपले भारत हे स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नांचे साकार रूप आहे.

शास्त्रज्ञांच्या बुद्धीमत्तेने आपला देश चंद्रावर पाऊल ठेवत आहे.

खेळाडूंनी आपल्या कामगिरीने देशाचा गौरव केला आहे.

शेतकरी आपल्या कष्टाने देशाला अन्नधान्य पुरवत आहेत.

डॉक्टर, शिक्षक, पोलीस, सैनिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपले देशवासीय उल्लेखनीय काम करत आहेत.

पण अजूनही काही आव्हानं आपल्यासमोर आहेत. बेरोजगारी, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा या समस्यांवर आपल्याला मात करावी लागेल. शिक्षण हाच या समस्यांचा उपाय आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करू या.

स्वच्छ भारत अभियान, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास या क्षेत्रातही आपल्याला काम करावे लागेल.

एक सच्चे नागरिक म्हणून आपल्या देशाच्या विकासात आपले योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे.

या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन, देशासाठी संकल्प करूया कि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या मेहनतीने, आपल्या एकतेने आपण भारताला जगात आदर्श देश बनवूया .

जय हिंद!

वंदे मातरम !

भारत माता कि जय!


3. लहान मुलांसाठी 15 ऑगस्ट भाषण मराठी (15th August speech in Marathi for kids)

नमस्कार , माझे नाव अदिती आहे .

आज 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन!

आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले . त्यावेळी भारताला ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले होते.

आपला देश हा 150 वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये झुलत होता .

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्यांच्या महान बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत.

या स्वतंत्र भारताची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

आपल्या स्वतंत्र भारताचे रक्षण करूया.

स्वच्छता ही सेवा आहे, आपण आपला परिसर स्वच्छ ठेवूया.

आपला देश स्वच्छ आणि सुंदर ठेवूया.

झाडे लावूया आणि झाडे जगवूया.

शिकणे महत्वाचे आहे, आपण चांगले शिक्षण घेऊया.

आपल्या छोट्या छोट्या कृतीतून प्रगतीशील भारत घडवूया.

आपला देश महान आहे, आपण त्याला अधिक महान बनवूया.

आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचे प्रतीक आहे आणि तो असाच उंच उंच आकाशात फडकत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि त्यासाठी आपण सतत सतर्क आणि कर्तव्यदक्ष राहूया.

जय हिंद! जय भारत!


मोर पक्षाची संपूर्ण माहिती मराठी

ऑलिम्पियाड परीक्षा संपूर्ण माहिती मराठी


4. 15 ऑगस्ट भाषण मराठी (15 August Speech Marathi)

आजच्या कार्यक्रमचे अध्यक्ष , आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ,

आज आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत .

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण केली..

दीडशे वर्षे आपला देश इंग्रजांच्या गुलामीत होता .

इंग्रजांनी आपल्या देशावर अनेक अत्याचार केले , आपल्या देशातील नागरिकांचा छळ केला .

इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले .

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी, भगतसिंग ,राजगुरू आणि अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी झुंज दिली .

आज त्यांच्या त्या महान बलिदानामुळेच आपण या स्वतंत्र भारतात मुक्तपणे वावरत आहोत.

आज आपल्याला आपले उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याचे , आपले ध्येय गाठण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.

आता कोणतीही परकीय शक्ती आपल्याला प्रगती करण्यापासून रोखू शकत नाही

आपण शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यायला हवे.

आपल्या कर्तव्याचे पालन करून देशाची प्रतिष्ठा वाढवायला हवी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरी देशभक्ती आपल्या हृदयात असली पाहिजे.

शिक्षण, कर्तव्य, देशभक्ती हेच आपले खरे शस्त्र आहे.

आजच्या तरुण पिढीला देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी आहे.

आपण आपल्या देशाला जागतिक पटलावर नवे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

आपल्यातली शक्ती, बुद्धी आणि कर्तव्यनिष्ठा यांचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करूया.

या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण आपल्या देशाला नव्या उंचीवर नेण्याचे संकल्प करूया.

एकजुटीने, सहकार्याने आणि कर्तव्यपरायणतेने आपण सगळे मिळून विकसित भारताचे स्वप्न साकार करूया.

जय हिंद ! जय भारत !


भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट, 1947 रोजी राष्ट्रध्वज पहिल्यांदा कोणी आणि कोठे फडकावला?

भारतात पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वज फडकावला.


Leave a Comment